• Crevision Theme
  • Crevision Theme
  • Crevision Theme

" सामर्थ्य आहे वाचनाचे... जो जो वाचेल तयाचे... परंतु तेथे अधिष्ठानचे अधिष्ठान पाहिजे! "

थोडक्यात

तो सोनेरी काळच होता जेव्हा दर्जेदार साहित्याने ओथंबून भरलेले मराठी दिवाळी अंक उदयास येत होते. दिवाळी सणाच्या निमित्ताने बहुतांश मराठी घरांमधे आकाश कंदील, रांगोळी, नवीन कपडे, सुगंधीत उटणे यांसोबत दिवाळी अंकाची देखील आवर्जून खरेदी होत असे. अशा या दिवाळी अंक वाचनाची ओढ असणाऱ्या काळात १९७० साली अधिष्ठान दिवाळी अंकाची वाटचाल सुरु झाली. अधिष्ठानची संस्थापना कै. मनोहर गणपत पांचाळ यांनी केली.
४१ वर्षे अधिष्ठानचे संपादन त्यांनी अत्यंत कुशलतेने केले व महाराष्ट्र भर अंकाला प्रसिद्धी प्राप्त करून दिली. अधिष्ठान दिवाळी अंकाने गेली ४२ वर्षे आपली परंपरेची ज्योत अखंडित प्रज्वलित ठेवली आहे.